"बिरबल नी चोराला पकडले" | TBSPlanet Comics
was successfully added to your cart.

“बिरबल नी चोराला पकडले”

(1)

एकदा एक श्रीमंत व्यापारी अकबरचा दरबारात येतो आणि म्हणतो की त्यचा घरी चोरी झाली. तो
म्हणतो, “मला वाटतं की माझा नोकरानी चोरी केली असेल.”

 

(2)

बिरबल म्हणतो, “तुम्ही काळजी करू नका. चोराला शोधण्यात मी तुम्हाला मदत करील.”

 

(3)

बिरबल त्या व्यापाऱ्याचा घरी जातो आणि सगळ्या नोकरांना एका रांगेत उभं राहिला सांगतो.

 

(4)

बिरबल त्यांना विचारतो, “व्यापार्याचा घरात तुमच्या पैकी कोणी चोरी केली आहे?” सगळे नोकर
एकाच आवाजात म्हणतात, “मी नाही केली.”

 

(5)

बिरबल सगळ्या नोकरांना सारख्या लांबीची काडी देतो आणि म्हणतो, “जो कोणी चोर असेल
त्याची काडी उद्या दोन इंच लांब होईल. मी तुमच्या कड्या पाहिला येईल. सगळे जण हझर राहा.”

 

(6)

दुसर्या दिवशी, बिरबल सगळ्या नोकरांना आपआपली काडी दाखवायला म्हणतो. त्याचा लक्षात
येतं की एका नोकराची काडी दोन इंच लहान आहे.

 

(7)

बिरबल म्हणतो, “आहा! हाच तो चोर आहे.”

 

(8)

नंतर व्यापारी बिरबल कडे जातो आणि विचारतो, “तुम्ही चोराला कस पकडल?” बिरबल म्हणतो,
“चोरानी दोन इंच काडी कापली हा विचार करून की त्याची काडी दुसर्या दिवशी लांब होईल.”

 

www.facebook.com/TBSPlanet

More FREE COMICS

Shop More Comics

Leave a Reply